गणेश सहकारी दुध व्यवसायिक संस्थेने आत्याधुनिक सोयिसुविधा युक्त असे दुध पिशवी पॅकिंग केंद्राची स्थापना केली आहे. दुध पिशवी पॅकिंगवेळी प्रथम दूधाचे परिक्षण करुन दूधाची गुणवत्ता तपासली जाते व त्यानुसार दूधाची पिशवी पॅकिंग केले जाते दूध परिक्षण चाचणी व गुणवत्ता निश्चित करण्यासाठी आवश्यक असलेली आधुनिक यंत्र साहित्य सामुग्री संस्थेमध्ये उपलब्ध आहे . त्यानुसार दूधाचे परिक्षण आणि गुणवत्ता तपासणी अचुक व अनुभवी कर्मचारी वर्गाकडून केले जाते.
गणेश सहकारी दुध व्यवसायिक संस्थेने सामजिक बांधिलकी जपत व राजुरी गावाची प्रतिष्ठा उंचावत आपल्या दुध पिशवीला " राजुरी दुध " असे नाव दिले असुन वेगवेगळया आकाराच्या दुध पिशव्या उपलब्ध करून दिल्या आहेत.