इ.स.1972 सालच्या झालेल्या दुष्काळाचा सामना करत असताना.वेगवेगळ्या प्रकारच्या येणार्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी काही व्यावसायिक मार्ग शोधला पाहिजे. या पवित्र हेतूने प्रेरित होऊन दि.8 मार्च 1976 रोजी कै. रामचंद्र सदाशिव पा.औटी,कै.कृष्णा दारकू औटी व प्रथम चेअरमन कै.नारायण विठोबा घंगाळे, कै.नारायण गोपाळा औटी आणि त्यांचे सहकारी यांच्या प्रेरणेने आपल्या राजुरी गावामध्ये गणेश नावाच्या दूध संस्थेचा श्री गणेश केला. या छोटया वृक्षाचे आज वटवृक्षात रुपांतर झाल्याचे पाहताना आनंद वाटत आहे.आपणा सर्वांच्या सहकार्याने अथक प्रयत्नाने प्रगतीचा एकेक टप्पा संस्था पार करत आहे. या संस्थेने परिसरातील अनेक कुटुंबियांचे संसार मळे आपल्या अमृत सिंचनाने फुलविले आहेत.दुध सागराचा दुध महासागर होऊन सभासदांचे प्रपंच सुखाने झालेले पाहण्याचे स्व. नाथाशेठ लक्ष्मण डुंबरे व स्व.जिजाभाऊ विष्णू औटी सरांचे स्वप्न आम्हीही त्याच नेटाने जोमाने पुढे सत्यात उतरविण्याचा प्रयत्न करत आहोत.