गणेश सहकारी दूध व्यावसायिक संस्थेने आपल्या सर्व सभासदांच्या दुभत्या जनावरांच्या आरोग्य व दुग्धसंवर्धनासाठी लागणारा सर्व प्रकारचा पोषक आहार माफक दरामध्ये सभासदांना उपलब्ध होण्यासाठी गणेश पशुखाद्य केंद्राची स्थापना केली आहे. गणेश पशुखाद्य केंद्रामध्ये सरकीपेंड, शेंगदाणापेंड इ. सर्व प्रकारचा पशुआहार माफक दरामध्ये सभासदांना पुरविला जातो. उच्च प्रतिच्या पशुखाद्यामुळे दुभत्या जनावरांचे आरोग्य व दुग्धसंवर्धनाचे उदिष्ट साध्य झाले आहे.